तुझी चाल कशी मोरावानी डौलदार गं, अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बाली ट्रीप, पाहा फोटो
Actress Bhagyashree Mote : तुझी चाल कशी मोरावानी डौलदार गं, अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बाली ट्रीप, पाहा फोटो
bhagyashree mote
1/10
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी काहीना काही शेअर करत असते.
2/10
सध्या भाग्यश्री मोटे ट्रीपसाठी बालीला गेली असून तिने या ट्रीपचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
3/10
भाग्यश्री मोटे ही एक भारतीय अभिनेत्री असून, ती प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांमध्ये काम करते.
4/10
भाग्यश्रीने मुंबईतील प्रह्लादराय दलमिया लायन्स कॉलेजमधून मास मीडियामध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
5/10
भाग्यश्रीला लहानपणापासूनच नृत्य, गायन आणि अभिनयाची आवड होती. तिने आपल्या कॉलेजच्या काळात 'विश्वगर्जना' या व्यावसायिक नाटकात अभिनय केला. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2011 मध्ये 'शोधू कुठे' या मराठी चित्रपटातून झाली.
6/10
तिच्या दूरदर्शन कारकिर्दीची सुरुवात 'देवों के देव...महादेव' या हिंदी मालिकेतील एका छोट्या भूमिकेपासून झाली. त्यानंतर तिने 'देवयानी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारली, ज्यामुळे ती प्रेक्षकांमध्ये तिची लोकप्रियता वाढली
7/10
'सिया के राम' या हिंदी मालिकेत तिने शूर्पणखा ही भूमिका साकारली, ज्यामुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.
8/10
भाग्यश्रीने 'काय रे रास्कला', 'पाटील', 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'विठ्ठल', 'एकदम कडक' या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
9/10
याशिवाय तिने 'चिकाटी गडिलो चिथाकोटुडू' या तेलुगू चित्रपटातही अभिनय केला आहे. 2021 मध्ये तिने 'भवाई' या हिंदी चित्रपटात 'प्यारी' ही भूमिका साकारली.
10/10
भाग्यश्री मोटे ही एक प्रतिभावान अभिनेत्री असून, तिने विविध भाषांतील चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Published at : 26 May 2025 04:57 PM (IST)