Bhagyashri Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला; सोशल मीडियावरुन दिली माहिती!
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याचं जाहीर केलंय.
bhagyahree mote
1/10
अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashri Mote) हीने नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याची माहिती दिली आहे.
2/10
भाग्यश्री ही मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत (Vijay Palande) लग्न करणार होती.
3/10
2022 मध्ये या जोडप्याने साखरपुडा (Engagement) देखील उरकला होता. पण आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
4/10
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याचं जाहीर केलंय. त्याचप्रमाणे यावेळी तिने त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये स्पेस देण्याचीही विनंती यावेळी केलीये.
5/10
भाग्यश्री आणि विजयच्या साखरपुड्याला हृतिकनेही हजेरी लावली होती. कारण विजय हा हृतिकचा मेकअप आर्टिस्ट आहे.
6/10
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं की, नमस्कार मित्रांनो, तुम्हासा सांगू इच्छिते की, बराच काळ एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
7/10
मात्र आम्ही चांगले मित्र राहणार आहोत. त्यामुळे कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. दरम्यान भाग्यश्री आणि विजयने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाहीये.
8/10
मराठी मालिकाविश्वात अभिनयाची छाप सोडल्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
9/10
यानंतर तिने माझ्या बायकोचा प्रियकर, काय रे रास्कला या चित्रपटातही काम केलं.
10/10
तसेच तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलुगु चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. (pc:bhagyahree mote/ig)
Published at : 10 Apr 2024 04:22 PM (IST)