PHOTO : आरसपाणी सौंदर्य! ‘लिंबू कलरची साडी’ फेम अश्विनी भावेंचे सुंदर फोटो...
आजही जेव्हा ‘लिंबू कलरची साडी’ म्हटले जाते तेव्हा, अभिनेत्री अश्विनी भावे (Ashvini Bhave) यांचा चेहरा लगेच डोळ्यांसमोर येतो. अभिनेत्री अश्विनी भावे आज (7 मे) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App90च्या दशकांत अश्विनी भावे यांनी आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले होते. मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्या सक्रिय होत्या. आजघडीला जरी त्या मनोरंजन विश्वापासून दूर असल्या, तरी त्यांची गणना मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते.
अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी मुंबईत झाला. मुंबईतील साधना विद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबई मधील रुपारेल कॉलेज मधून त्यांनी आपली फिलॉसॉफीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथून फिल्म संबंधित विषयात पदविका मिळवली.
कॉलेजदरम्यानच त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्या छोट्या पडद्याकडे वळाल्या. ‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
‘युगपुरुष’ मालिकेनंतर त्यांच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. ‘शाबास सुनबाई’ या चित्रपटामधून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी ‘अशीही बनवाबनवी’ या चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे हिंदीतूनही ऑफर येऊ लागल्या.
‘हिना’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर भरपूर कमाई केली. ‘हिना’ हा चित्रपट त्याकाळच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील ‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते, जे आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते. (Photo : @ashvinibhave/IG)