Yami Gautam : यामी गौतमच्या अडचणीत वाढ! EDकडून समन्स, का केली जाणार आहे यामीची चौकशी?
सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून (ED) बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. (photo courtesy : @yamigautam instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे समन्स FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघन केल्या संदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने पाठवलं असल्याची माहिती आहे.(photo courtesy : @yamigautam instagram)
यामी गौतमला 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याबाबत ही नोटीस बजावली आहे.(photo courtesy : @yamigautam instagram)
माहितीनुसार यामी गौतमच्या बँक अकाऊंटमधून जवळपास दीड कोटींच्या परदेशी चलनाचा व्यवहार झाला आहे. यासंदर्भात तिनं अधिकाऱ्यांना सूचना दिली नसल्याचं समोर आलं आहे (photo courtesy : @yamigautam instagram)
यामीने केलेल्या व्यवहारात परदेशी चलनाच्या व्यवहारात अस्पष्टता आढळून आली आहे. (photo courtesy : @yamigautam instagram)
यामीच्या बँक खात्यातील काही परदेशी व्यवहारात गोंधळ आढळून आला असल्याने यामीची चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून यामीला ही दुसरी नोटीस आहे. (photo courtesy : @yamigautam instagram)
यामीनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आदित्य धर सोबत लग्न केलं आहे. तीन दिवसांपूर्वीचं ती हनिमूनवरुन परत आली आहे. त्यानंतर ती 'ए थर्सडे' सिनेमाच्या शूटिंगसाठी रवाना झाली. या सिनेमात यामी नैना जायसवाल नावाच्या एका स्कूल टीचरची भूमिका साकारणार आहे. (photo courtesy : @yamigautam instagram)