Shraddha Kapoor Insta Followers: श्रद्धा कपूर इन्स्टाग्रावरही हिट! मोदी, प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे

Shraddha Kapoor Followers : स्त्री 2 हा चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. इन्स्टाग्रामवरील लोकप्रियतेच्या बाबतीत ती पंतप्रधान मोदींच्याही एक पाऊल पुढे पोहोचली आहे.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर देसी गर्ल म्हणून ओळख असलेल्या प्रियंका चोप्रा मागे टाकले आहे.

1/7
हिंदी सिनेसृष्टीची प्रसिध्द अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्याही एक पाऊल पुढे पोहोचली आहे.
2/7
बॉलिवूड सिनेसृष्टीची दिग्गज अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिलादेखील श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले आहे.
3/7
'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर श्रद्धाला अधिकच लोकप्रियता मिळाली आहे.
4/7
'स्त्री 2' चित्रपटातील श्रद्धाच्या अभिनयाला चाहत्यानी पसंती दाखवली आहे. 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झालेली दिसून आली.
5/7
इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत अभिनेत्री श्रद्धा कपूर टॉप 3 च्या यादीत सामील झाली आहे. भारतातील टॉप इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली, दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि तिसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे.
6/7
श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर 91.4 दशलक्ष (मिलियन) फॉलोअर्स आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इन्स्टाग्रामवर 91.3 दशलक्ष (मिलियन) फॉलोअर्स आहेत.
7/7
'स्त्री 2' चित्रपटानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. या चित्रपटातील श्रद्धा कपूरचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून याचा परिणाम तिच्या लोकप्रियतेवरही दिसून येत आहे.
Sponsored Links by Taboola