काटा लगा गर्लचं निधन, पती दुसरा संसार थाटणार? नेमकं खरं काय?
Actor parag tyagi will get married: पॉडकास्टमध्ये परागनं दुसरं लग्न करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Parag tyagi
1/6
प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जून 2025रोजी निधन झालं. तिच्या मृत्यूच्या बातमीनं फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता.
2/6
शेफाली जरीवालाच्या दु:खद निधनानंतर तिचा पती पराग त्यागी एकटा पडलाय. पराग अजूनही या धक्क्यदायक घटनेतून स्व: ताला सावरण्याचा प्रयत्न करतो आहे.
3/6
नुकताच पार पडलेल्या एका पाॉडकास्टमध्ये पराग त्यागीनं याबाबत खुलासा केला आहे. तसेच, परागने त्यांच्या नात्यातील काही सुंदर आठवणीही शेअर केल्या आहेत.
4/6
पॉडकास्टमध्ये परागला तू दुसरं लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं उत्तर दिलं. पराग म्हणाला, 'दुसरं लग्न कशासाठी करायचं? मला जास्त काळ जगण्याची इच्छा नाही. त्याआधीच मला मरण यावं', असं पराग म्हणाला.
5/6
'माझ्या आयुष्यात मला अशी वेळच नकोय की मला दुसर्या कुणाची गरज भासेल'.
6/6
शेफालीच्या निधनानंतर परागनं तिच्या आठवणीत एक टॅटू गोंदवलं. यानंतर या पॉडकस्टमध्ये परागनं पुन्हा शेफालीवर असलेलं त्याचं प्रेम व्यक्त केलं.
Published at : 17 Feb 2026 04:01 PM (IST)