IN PICS :अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?
Naseeruddin Shah : काही दिवसांपूर्वी हरिद्वार (Haridwar) येथील धर्मसंसद वादग्रस्त वक्तव्यानं गाजली. यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. (photo:naseeruddin49/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात एका प्रकारे गृहयुद्धसारखं वातावरण निर्माण केलं जात असल्याचंही नसिरुद्दीन शाह म्हणालेत. (photo:naseeruddin49/ig)
नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य: मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. एका मुलाखतीत नसिरुद्दीन यांनी सांगितले, 'मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण देशात 20 कोटी मुस्लिम आहेत, ते घाबरणार नाहीत तर लढतील' (photo:naseeruddin49/ig)
पुढे ते म्हणाले, ' मुस्लिमांमध्ये जरी भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी मुस्लिम हार मानणार नाहीत. मुस्लिमांना याचा सामना करावा लागेल कारण आपल्याला आपले घर वाचवायचे आहे, आपल्याला आपली मातृभूमी वाचवायची आहे, आपल्याला आपले कुटुंब आणि मुलांना वाचवायचे आहे.' (photo:naseeruddin49/ig)
त्यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (photo:naseeruddin49/ig)