Mohit Raina : अभिनेता मोहित रैनाने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास फोटो!
Mohit Raina Married : 'देवों के देव महादेव' ‘Devon Ke Dev Mahadev’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत अभिनेता मोहित रैनाने महादेवची भूमिका साकारली होती. (photo:merainna/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याने साकारलेली महादेवची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. मोहितने लग्नसोहळ्यातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (photo:merainna/ig)
मोहित रैनाने फोटो शेअर करत लिहिले आहे,खरे प्रेम कोणतेही अडथळे ओळखत नाही. ते अडथळ्यांचा सामना करते. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपण दोघे आता वेगळे नसून एक आहोत. या नवीन प्रवासात तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. (photo:merainna/ig)
त्यासोबत नवीन वर्षाच्या निमित्ताने मोहित रैनाने एक लांबलचक संदेशदेखील लिहिला आहे. मोहितने लिहिले आहे, 2021 वर्ष खास होते. या वर्षात मला जीवनाची खरी किंमत कळली आहे. कोरोनाकाळात माझ्या वाट्याला आलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. सुरक्षित रहा, घरात रहा आणि प्रेम पसरवा. प्रेम हेच आपल्याला जिवंत ठेवते. मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. (photo:merainna/ig)
सनी कौशल-राधिका मदानच्या 'शिद्दत' सिनेमाद्वारे मोहित रैना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (photo:merainna/ig)
'मुंबई डायरीज 26/11' या सीरिजमध्येदेखील त्याने डॉ. कौशिक ओबेरॉयची भूमिका साकारली होती. (photo:merainna/ig)