मुलीच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा होताच प्रिया बेर्डे यांच्याकडून महत्त्वाचा खुलासा
किंबहुना प्रेमच्या कुटुंबीयांशीही आपलं चांगलं नातं असल्याची बाब त्यांनी मांडली. परिणामी स्वानंदी आणि प्रेममध्येही हे मैत्रीचं नातं आहे, असं त्यांनी सांगितलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुणी हा तिचा प्रियकर असल्याचं म्हटलं तर, कुणी थेट ही चर्चा लग्नापर्यंतही नेली. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर स्वानंदीकडून ही पोस्ट डिलीटही करण्यात आली. बरं, तेव्हाही चर्चांनी जो धरला.
स्वानंदीनं शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. जीवनातील कोणा खास व्यक्तीसाठी भावना व्यक्त कराव्यात त्याप्रमाणंच तिचं हे कॅप्शन होतं. त्यामुळंच बहुधा या चर्चांना अधिक वाव मिळाला होता. पण, अखेरीस खुद्द प्रिया बेर्डे यांनी मात्र हे चित्र अधिक स्पष्ट केलं आहे. (सर्व छायाचित्र - स्वानंदी बेर्डे/ इन्स्टाग्राम)
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली, की स्वानंदी आणि प्रेम हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. प्रेमच्या वाढदिवसाच्या निमित्तानंच स्वानंदीनं ही पोस्ट शेअर केली होती.
कलाविश्वात आपल्या दमदार अभिनयानं एक काळ गाजवणारे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबानं त्यांचा वारसा पुढं आणला आहे. एकिकडे त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा चित्रपट वर्तुळात त्याची वेगळी ओळख प्रस्थापित करत असतानाच मागील काही दिवसांपासून लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिच्या नावाच्या बऱ्याच चर्चा होऊ लागल्या.
निमित्त होतं ते म्हणजे तिची एक सोशल मीडिया पोस्ट. प्रेम मोदी नावाच्या एका मित्रासोबतचा फोटो पोस्ट करत स्वानंदीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं.
मुलीच्या खासगी आयुष्याबाबत होणाऱ्या याच चर्चा पाहता अखेर खुद्द स्वानंदीची आई, म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा करत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -