गर्लफ्रेंडसाठी काहीपण! प्रेमात अंखड बुडाला 'हा' अभिनेता; प्रेयसीसाठी केली खास गोष्ट
Karan kundra viral tattoo : नुकताच करणनं तेजस्विनीच्या चेहऱ्याचा अतिशय सुंदर असा टॅटू आपल्या छातीवर गोंदवला आहे.

karan and tejasvi
1/7
अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी अत्यंत लोकप्रिय जोडी असून, फॅन्समध्ये या कपल्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
2/7
करण कुंद्रा आणि तेजस्वी अनेकवेळा एकत्र दिसून येतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
3/7
नुकताच करणनं तेजस्वीच्या चेहऱ्याचा अतिशय सुंदर असा टॅटू आपल्या छातीवर गोंदवला आहे.
4/7
मुंबईमध्ये पार पडलेल्या एका रमजान पार्टीत करणनं हा टॅटू फ्लॉन्ट केला असून, सोशल मीडियावर या टॅटूचे फोटोज जोरदार व्हायरल होत आहेत.
5/7
करणने काढलेल्या या टॅटूला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, फॅन्सने करणचं भरूभरून कौतुक केलं.
6/7
करण आणि तेजस्वी यांची भेट बिग बॉस सिझन 15 च्या घरात झाली होती. मात्र, बिग बॉस नंतरही ही जोडी बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळाली होती.
7/7
सोशल मिडियावर या कपल्सची अनेकवेळा चर्चा होते. पण, या टॅटूमुळे दोघांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोरदार रंगली आहे.
Published at : 25 Feb 2026 06:37 PM (IST)