Emraan Hashmi : 'ग्राउंड झिरो'च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये गेलेल्या इमरान हाश्मीवर दगडफेक! नेमकं काय घडलं?
अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी ग्राउंड झिरो (Ground Zero) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.पहलगाममध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना दगडफेक झाली
Actor Emraan Hashmi Kashmir E
1/10
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
2/10
पहलगाममध्ये या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीला दगडफेक झेलावी लागली आहे.
3/10
इमरान हाश्मी शूटिंग संपवून सेटवरून बाहेर पडला, तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
4/10
‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे शूटिंग संपवून कलाकार फिरायला बाहेर पडले, त्यानंतर काही लोकांनी इमरान हाश्मी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
5/10
या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
6/10
संध्याकाळी शूटिंग संपवून, इमरान हाश्मी (Emraan Hashmi) चित्रपटाच्या उर्वरित टीमसह पहलगामच्या मुख्य बाजारपेठेकडे जात होता.
7/10
त्यानंतर अचानक काही अज्ञात लोकांनी अभिनेत्यासोबत उपस्थित सर्व लोकांवर हल्ला केला आणि सर्वांनी त्याच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
8/10
या प्रकरणाचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
9/10
दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहेत. याप्रकरणी अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे.
10/10
निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.
Published at : 20 Sep 2022 10:08 AM (IST)