अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत नाही राहत अभिषेक-ऐश्वर्या? अभिनेत्याने स्वतः सांगितले..

जलसामध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा आणि सून त्यांच्यासोबत राहत नाहीत. चला तर जाणून घेऊया की अभिषेक त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलीसोबत कुठे राहतो.

aishwarya rai

1/8
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. असे अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत की अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काही ठीक नाही आणि ते वेगळे होत आहेत.
2/8
या सर्व अफवांमध्ये, अभिषेक बच्चनने अलीकडेच घटस्फोटाशी संबंधित एक पोस्ट लाईक केली होती, ज्याने अफवांच्या आगीत आणखीच भर टाकली होती.
3/8
आता अभिषेक बच्चनची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतः सांगितले होते की तो जलसामध्ये त्याच्या आई-वडिलांसोबत म्हणजेच जया आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत राहत नाही.
4/8
अभिषेक बच्चन यांनी 2018 साली 'मनमर्जियां'च्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याच्या आणि ऐश्वर्या 'जलसा'मध्ये नसल्याबद्दल सांगितले होते.
5/8
मुलाखतीत अभिषेक बच्चनसमोर विकी कौशलला त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. विकी कौशलला विचारण्यात आले- 'अभिषेकच्या घराचे नाव काय आहे?' त्यावर विक्कीने खूप विचार करून 'जलसा' म्हटले.
6/8
पण त्यानंतर अभिषेकने विकीला अडवले आणि म्हणाला- 'चुकीचे उत्तर, माझे आई-वडील जलसामध्ये राहतात. मी त्याच्या शेजारी असलेल्या वत्समध्ये राहतो.
7/8
एका पत्रकाराने घटस्फोटाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. सुखी कुटुंब कोणाला नको असेल? म्हातारपण त्यांच्या जोडप्यासोबत घालवायला कोणाला आवडत नाही? परंतु हे नेहमी तुम्हाला हवे तसे घडत नाही.
8/8
या पोस्टवर अभिषेक बच्चनचे लाईक पाहायला मिळाले. यानंतर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.
Sponsored Links by Taboola