आनंद दिघेंच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं, अभिजित पानसेंनी सांगितला 'तो' प्रसंग? शो दरम्यान आठवण काढली...
दिघेंचा अपघात हा त्यांच्या आणि सर्वच शिवसैनिकांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे, त्या क्षणी त्यांच्याबरोबरच्या लोकांपैकी एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत पानसे होते, ते म्हणाले...
Abhijit Panse on Anand Dighe accident
1/9
धर्मवीर म्हणून ओळखले जाणाऱ्या आनंद दिघे (Anand Dighe) अख्ख्या महाराष्ट्राला (Maharashtra News) माहीत होते, पण 'धर्मवीर' सिनेमामुळे (Dharmaveer Movie) त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू नव्यानं सर्वांना कळाले.
2/9
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अभिजीत पानसेंनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजळा दिला आहे.
3/9
आपल्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमासाठी अभिजीत पानसे ओळखले जातात. हाडाचे शिवसैनिक असलेले अभिजीत पानसे सध्या राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये आहेत.
4/9
माझ्या पुढच्या गाडीत दिघे साहेब होते तेव्हा वंदनाच्या इथे तो अपघात झाला. आम्ही उजवीकडे वळून गडकरीला गेलो होतो." अशाप्रकारे अभिजीत पानसेंनी आनंद दिघेंबद्दलची भावुक आठवण शेअर केली आहे.
5/9
अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत पानसे म्हणाले, "वंदे मातरम नाटकाच्या रिहर्सलला आनंद दिघे साहेब आले होते, तेव्हा माझा गोंधळ उडाला होता.
6/9
नंतर ते प्रयोगाला आले. गणेश दर्शन स्पर्धेच्या आधीचा जो कार्यक्रम होता तो मी बसवला होता. तेव्हा मनोहर जोशी सर लोकसभा अध्यक्ष होते.
7/9
असं म्हणतात ना, दिघे साहेब आता नाहीयेत तर मी कसा त्यांच्या जवळ वगैरे होतो, तर असं नाहीये. एवढा जवळ वगैरेचा भाग नाहीये, पण निश्चित मला त्यांचा सहवास लाभला."
8/9
"दिघे साहेबांबरोबर मी ऑडिओ कॅसेट केली. उदय सबनीस यांनी त्याचं निवेदन केलं होतं. त्या कॅसेटमध्ये त्यांची बायोग्राफी होती.
9/9
ती फार त्यांना आवडलेली. पण माझा राजकीय काही संदर्भ नव्हता. गणेश दर्शन स्पर्धेचे परीक्षक आम्ही होतो त्यावेळेला दिघे साहेबांचा अपघात झाला होता.
Published at : 27 Sep 2025 01:53 PM (IST)