Aamir Khan new girl friend : अमीर खानने वयाच्या 60 व्या वर्षी करुन दिली नव्या गर्लफ्रेंडची ओळख, भुवनला मिळाली नवी गौरी
Aamir Khan new girl friend : अमीर खानने वयाच्या 60 व्या वर्षी करुन दिली नव्या गर्लफ्रेंडची ओळख, भुवनची नवी गौरी कोण आहे तरी कोण?
Photo Credit - abp majha reporter
1/10
अभिनेता आमीर खान याने 60 व्या वाढदिवसा दिवशी माध्यमांना नव्या गर्लफ्रेंडची ओळख करुन दिली आहे.
2/10
आमीरच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी आहे, ती मूळची बेंगलोरची आहे.
3/10
आमीर त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करुन देताना म्हणाला की, आम्ही 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो.
4/10
मात्र, दीड वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोघं लग्न करणार की नाही? याबाबतही आमीरने भाष्य केलंय.
5/10
नव्या गर्लफ्रेंडबाबत म्हणाला की, 60 वय झाल्यानंतर लग्न करणे सूट होत नाही. मात्र, आम्ही दोघं एकमेकांसोबत खूश आहोत. लग्नाचा विचार नंतर करु..यावेळी आमीरने गौरीसाठी "कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है...", हे गाणं आमीरने यावेळी गायलंय.
6/10
आमीर आणि गौरी 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघे दीड वर्षांपूर्वी अचानक भेटले होते. "आता आम्ही खुश आहोत, फायनली भुवनला त्याची गौरी मिळालीये", असंही आमीरने यावेळी बोलताना म्हटलंय.
7/10
अमीरने वयाच्या 60 वर्षी नव्या गर्लफ्रेंडची ओळख करुन दिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
8/10
मीडिया रिपोर्ट्नुसार, आमीरची नवी गर्लफ्रेंड सिनेक्षेत्रातील नाही.
9/10
दरम्यान, तिला 6 वर्षांचं मुल देखील असल्याची माहिती आहे.
10/10
आमीरने तिची ओळख करुन देताना सांगितलं की, मला तिचे फोटोग्राफ मीडियात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या या विनंतीचा सर्वांनी मान ठेवावा.
Published at : 13 Mar 2025 05:38 PM (IST)