Aamir Khan : आमीर कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार?

Aamir Khan Third Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खान (Aamir Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. (photo:amirkhanactor_/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काही दिवसांपूर्वी आमीरचा किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट झाला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.(photo:amirkhanactor_/ig)

आता आमीर तिसरं लग्न करणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. (photo:amirkhanactor_/ig)
एका रिपोर्टनुसार, आमीर लवकरच तिसरं लग्न करणार आहे. अशी चर्चा आहे की, एका चित्रपटातील को-स्टारसोबत आमीर लग्नगाठ बांधणार आहे. आमीर कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार?, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
आमीरने अजून त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. लवकरच आमीरचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo:amirkhanactor_/ig)
हम है राही प्यार के, राजा हिंदूस्थानी, लगान, दिल चाहता है, फना, रंग दे बसंती, गजनी, तारे जमिन पर, धूम 3 आणि पिके या आमीरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आमीरने 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले होते. (photo:amirkhanactor_/ig)