A R Rahman: हा आहे सर्वात भारतातील श्रीमंत गायक; 1700 कोटींचा मालक, काही मिनिटांत कमावतो 3 कोटी!
हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून एआर रहमान आहे, ६ जानेवारीला आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचा जन्म मद्रास येथील हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे बालपणीचे नाव दिलीप कुमार राजगोपाल होते.
त्यांचे वडील आरके शेखर हे तमिळ आणि मल्याळम चित्रपटांचे संगीतकार होते. त्यामुळे त्यांनाही सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी तो पियानो वाजवायला शिकला.
वयाच्या 9व्या वर्षी वडिलांची सावली गेली. त्यानंतर अभ्यासासोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रहमानला काम करावे लागले. त्यामुळे तो अभ्यास करू शकला नाही आणि शाळेत नापास झाला.
रेहमानने आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते तेव्हा ते एका सुफी संताला भेटले होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी ते पुन्हा सुफी संताला भेटले आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला ज्यामुळे त्यांना शांती मिळाली. म्हणून, गायकाने त्याच्या कुटुंबासह इस्लाम स्वीकारला, त्यानंतर त्याने आपले नाव दिलीप कुमार वरून बदलून अल्लाह रखा रहमान केले.
त्यावेळी त्यांचे वय सुमारे २३ वर्षे होते, 1991 मध्ये रहमानने स्वतःचे संगीत रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. 1993 मध्ये चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी त्यांना त्यांच्या 'रोजा' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली.
यासाठी त्याला 25000 फी मिळाली. हा चित्रपट म्युझिकल हिट ठरला आणि रहमानला त्याच्या पहिल्याच चित्रपटात फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
आज ए आर रहमानचे नाव केवळ बॉलिवूड, साऊथमध्येच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय आहे. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक बनला आहे.
हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फिल्म इंडस्ट्रीच्या अंतर्गत सूत्रांवर विश्वास ठेवला तर एआर रहमान गाण्यासाठी इतर गायकांपेक्षा जास्त फी घेतात. रहमान बहुतेक स्वतःची गाणी गातो. पण त्याने दुसऱ्याच्या गाण्याला आवाज दिला तर निर्माते त्याला भरमसाठ फी देतात.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर एआर रहमान एका गाण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये घेतात.
एआर रहमानच्या नावावर 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहेत. पहिला रेकॉर्ड 'वंदे मातरम' गाण्याच्या नावावर आहे. हे गाणे त्यांनी अनेक भाषांमध्ये गायले आहे.