A R Rahman Birthday: संगीत क्षेत्राला कलाटणी देणाऱ्या रेहमान यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया!
भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचा आज 55वा वाढदिवस. (photo:arrahman/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1992 सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. (photo:arrahman/ig)
पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो. (photo:arrahman/ig)
6 जानेवारी 1966 साली चेन्नईमध्ये रेहमान यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव दिलीप कुमार असे आहे. (photo:arrahman/ig)
रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला. 23व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्विकार करत त्यांनी स्वत:चे नाव अल्लाहरखा रेहमान असे नाव ठेवले. (photo:arrahman/ig)
2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रेहमान यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत. (photo:arrahman/ig)