Glamour : नागपूरच्या दिशाची 'फेमिना मिस इंडिया 2022'मध्ये भरारी
स्वतःवर दृढ विश्वास आणि कुटुंबियांची साथ असल्यास तुम्हाला जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकत नसल्याचा अनुभव नागपूरच्या दिशा पाटीलने सांगितला. दिशाने फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2022चा खिताब जिंकला. यासोबतच प्रतिष्ठेच्या होणाऱ्या फेमिना मिस इंडिया 2022मध्ये सहभागी इतर राज्यांच्या 31 स्पर्धकांसोबत स्पर्ध करत महाराष्ट्रचे प्रतिनिधित्वही केली हे विशेष.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटिव्हीवरही मॉडेल आणि अभिनेत्रींना बघून 'मोठी झाल्यावर मी त्यांच्यासारखी बनणार आणि तुम्ही मला टिव्हीमध्ये बघाल' अशी ती पालकांना नेहमी सांगायची.
लहानपणी बघितलेले स्वप्नाच्या दिशेने दिशा मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पुढील वाटचाल करीत आहे.
मराठी कुटुंबातून आलेली मुलगी या झगमगणाऱ्या क्षेत्रात आपली जागा कशी निर्माण करेल असा विचारही पालकांच्या मनात कधी आला नसून त्यांचे मला मिळणारे सपोर्टच आपल्या यशाचे रहस्य असल्याची भावना तिने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.
दिशा नागपूरच्या मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्टीटेक्चरची अंतिम वर्षाची विद्यार्थीनी आहे. शिक्षणासोबतच ती मॉडेलिंग करते. आजवर तिने अनेक पोस्टर शूट, टिव्हीच्या जाहीराती आणि फॅशन शूट केले आहेत.
तिच्यासाठी आई-वडीलच तिचे गॉडफादर अन् गॉडमदर असल्याचे ती म्हणाली. दिशाची आई कवियित्री, गझलकार धनश्री पाटील आहे. तर वडील किशोर पाटील अभियंता आहेत.
विविध सौंदर्य स्पर्धेत तिने फक्त भाग घेतला नसून विदर्भवासियांना गर्व वाटेल अशी कामगिरी करीत यश खेचून आणले.
तिने पहिल्यांदा 2017मध्ये नागपुरातच 'टाइम्स फ्रेश फेस' या पिजेंटबद्दल ऐकले आणि सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. स्पर्धेची वाट बघत ती उत्साही होती. कॅमेऱ्यासमोर तिने ऑडिशन दिला नसून मी फक्त एन्जॉय केला अन् माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे ती म्हणते.
2018मध्ये दिशाने 'सेंट्रल फॅशन आयकॉन' मध्येही भाग घेतला आणि मुंबई येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत सेकंड रनरअप ठरली. त्या स्पर्धेच समोर बसलेल्या जजेसला मी आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकले त्याचा आनंद होता असेही ती म्हणाली.
2019मध्ये झालेल्या फेमिना स्टाइलिस्टा वेस्टच्या टॉप 8 पर्यंत तिने मजल मारली. अभिनेत्री वाणी कपूरच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.
यानंतर 2021मध्ये झालेल्या मिस दिवा या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने सहभाग नोंदविला होता.