एका दिवसात 30 गोळ्या आणि इंजेक्शन... 'नागिन' होण्यापूर्वी अभिनेत्रीची अशी होती अवस्था!
मौनी रॉयने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. जिथे अभिनेत्रीने सांगितले की, नागिनला साइन करण्यापूर्वी तिची तब्येत खूप खराब होती.
मौनी रॉय
1/9
टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावणारी मौनी रॉय तिच्या अभिनय आणि शैलीमुळे सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळवते.
2/9
मौनी रॉयने क्यूंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, पण तिला खरी ओळख एकता कपूरच्या नागिन या शोमधून मिळाली.
3/9
पण तुम्हाला माहीत आहे का की, नागिन साइन करण्यापूर्वी मौनी रॉयची तब्येत इतकी बिघडली होती की तिला दिवसातून 30 गोळ्या घ्याव्या लागल्या आणि अनेक वेळा इंजेक्शन घ्यावे लागले.
4/9
आम्ही नाही तर खुद्द मौनी रॉयने एका मुलाखतीत हे सांगितले आहे.
5/9
मौनी रॉय म्हणाली- 'नागिन' सुरू होण्यापूर्वी मी अशा टप्प्यात होते, जेव्हा असे वाटत होते की माझे आयुष्य संपले आहे... मी गंभीर आजारी आहे.
6/9
मला L-4-L-5 चा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे मला सरळ उभे राहता येत नव्हते. मी दिवसातून 30 गोळ्या घेत असे. इंजेक्शनही देण्यात आले.
7/9
मौनी रॉयने मुलाखतीत सांगितले - जेव्हा तिला नागिन ऑफर करण्यात आली तेव्हा ती तीन महिने अंथरुणावर पडली होती.
8/9
मौनी म्हणाली- माझे वजन किती किलो वाढले आहे हे मला माहीत न्हवते... तो काळ खूप वाईट होता.
9/9
मी तीन महिने अंथरुणाला खिळून होते आणि याच वेळी मला नागिनसाठी फोन आला.(photo:imouniroy/ig)
Published at : 04 May 2024 04:55 PM (IST)