2021 Fashion अवॉर्ड्समध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा स्टायलिश लूक

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2021 फॅशन अवॉर्ड्समध्ये उपस्थित राहण्यासाठी लंडनमध्ये गेले आहेत. निक जोनासने अलिकडेच इंस्टाग्रामवर प्रियंकासोबतचे काही फोटो शेअर करत लिहलंय, 'द स्टार ऑफ द शो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2021 च्या फॅशन अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटसाठी प्रियांकाने भन्नाट लूक परिधान केला होता. ती फ्लोरल प्रिंटेड पँट सूटमध्ये दिसली. तिचे शूजही त्याच प्रिंटचे होते.

निकने प्रियंकासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात एकमेकांकडे पाहत पोज देताना दिसले. प्रियांकाने लंडनचे प्रसिद्ध डिझायनर रिचर्ड क्विन यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. निकबद्दल बोलायचे तर त्याने काळ्या रंगाचा सूट घातला होता.
या दोघांच्या रेड कार्पेट लूकची नेहमीच चर्चा असते. जवळपास सहा महिन्यानंतर हे दोघे रेड कार्पेटवर एकत्र दिसले.
निक आणि प्रियंकाच्या लग्नाला 2 डिसेंबरला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. दोघांनी 2 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केले. हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला.