15 August Independence Day: 'उरी' ते 'जवान'; 15 ऑगस्टला देशभक्तीचा जोश वाढवणारे 'हे' खास 7 सिनेमे, पाहा दमदार चित्रपटांची यादी
15 August Independence Day Special: 15 ऑगस्टला देशभक्तीचा जोश वाढवणारे खास 7 चित्रपट घरबसल्या पाहा.
Continues below advertisement

15 August Independence Day Special
Continues below advertisement
1/8
बॉलिवूडने वेळोवेळी सैनिक, वायुसेनेचे जवान, गुप्तहेर, वैज्ञानिक आणि खेळाडूंच्या अशा अनेक प्रेरणादायी कथा पडद्यावर साकारल्या आहेत. या 15 ऑगस्टला तुम्हाला देशभक्तीच्या रंगात रंगलेला एखादा दमदार चित्रपट पाहायचा असेल, तर हे चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असायला हवेत.
2/8
शाहरुख खानचा ‘जवान’ हा अॅक्शन, भावना आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ आहे. अॅटलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट भ्रष्टाचार, न्याय आणि सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर भाष्य करतो.
3/8
हृतिक रोशनचा ‘लक्ष्य’ हा अशा तरुणाची कथा आहे, ज्याला सुरुवातीला आयुष्यात आपले ध्येय काय आहे, याची कल्पना नसते. मात्र, सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.
4/8
कार्तिक आर्यन अभिनित ‘चंदू चॅम्पियन’ हा माजी भारतीय सैनिक आणि पॅरालिम्पिक चॅम्पियन मुरलीकांत पेटकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. अनेक अडचणी आणि शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी ज्या प्रकारे आपली स्वप्ने पूर्ण केली, ती कथा प्रत्येकाला प्रेरणा आणि आत्मविश्वास देते.
5/8
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा भारतीय वायुसेनेतील शूर फायटर पायलट्सची कथा सांगतो. थरारक हवाई अॅक्शनसोबतच चित्रपटात मैत्री, देशाप्रती जबाबदारी आणि सर्वोच्च बलिदानाची भावना प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/8
जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा अशा महिलेचा प्रवास दाखवतो, जिने अनेक सामाजिक आणि व्यावसायिक अडथळ्यांवर मात करून भारतीय वायुसेनेत स्वतःची ओळख निर्माण केली.
7/8
विकी कौशलच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा 2016सर्जिकल स्ट्राइकपासून प्रेरित चित्रपट आहे. भारतीय जवानांचे शौर्य, रणनीती आणि देशाच्या रक्षणासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची त्यांची जिद्द या चित्रपटातून प्रभावीपणे समोर येते.
8/8
अक्षय कुमार आणि वीर पहाडिया अभिनित ‘स्काय फोर्स’ हा १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कर्तव्य, मैत्री आणि बलिदानाची कथा सांगणारा हा चित्रपट देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांचा जाज्वल्य उत्साह आणि समर्पण समोर आणतो.
Published at : 14 Aug 2026 01:45 PM (IST)