OTT Movies And Webseries: 14 ऑगस्टला OTTला रिलीज होणार दर्जेदार चित्रपट; हॉरर, कॉमेडी अन् रोमान्स, तुमचा विकेंडचा प्लॅन काय?
OTT New Released Films: लाँग विकेंडला आपण घरबसल्या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकता.
Continues below advertisement

OTT New Released Films
Continues below advertisement
1/8
ओटीटी प्रेमींसाठी हा लाँग विकेंड खूप खास असणार आहे. 14 ऑगस्ट रोजी बऱ्याच वेब सिरीज आणि चित्रपट विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यात हॉरर, थ्रिलर, अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी यांसारख्या जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे.
2/8
'अरुपी' ही एक हॉरर थ्रिलर फिल्म आहे. यात निरंजन मुख्य भूमिकेत आहे. यात एक हवेली दाखवण्यात आली आहे. 'पद्मिनी' नावाची आत्मा बाहुलीतून चुकून मुक्त होते. नंतर नेमकं काय घडतं? हे आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
3/8
रोमँटिक ड्रामा सिनेमा 'कॉकटेल 2' आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. लव्ह ट्रायंगलचा हा सिनेमा आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
4/8
'भारत भाग्य विधाता' हा सिनेमा झी 5 वर उपलब्ध आहे. या सिनेमात कंगना रनौत मु्ख्य भूमिकेत असून, हा चित्रपट 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्ररित आहे.
5/8
'मिस्टर वर्क फ्रॉम होम' हा एक फॅमिली कॉमेडी सिनेमा आहे. हलकी फुलकी फिल्म आपल्याला सन एनएक्सटीवर पाहता येईल.
Continues below advertisement
6/8
'डोंट से गुड लूक' ही एक हाय स्कूल म्यूझिकल शो आहे. या कॉमेडी ड्रामा सिनेमात हॉलिवूड कलाकारांची फौज आहे. हा सिनेमा आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
7/8
'पंचाली पंचभर्तृका' ही एक कॉमेडी थ्रिलर फिल्म आहे. चार मित्र एका एनआरआय महिलेच्या मृत्यू प्रकरणात अडकतात. नंतर नेमकं काय घडतं? हे सिनेमातून उघड होईल. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म Ahaवर रिलीज होणार आहे.
8/8
'चार्जशीट 03-08' ही एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. हा चित्रपट आपल्याला झी 5वर पाहता येईल. एक मुलगी अचानक गायब होते. मुलीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नसतात. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस नेमकं काय करतात? हे आपल्याला सिनेमातून पाहायला मिळेल.
Published at : 13 Aug 2026 01:40 PM (IST)