Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
भाजपचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या प्रचारासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या बाबासाठी मृणालीराजे मैदानात उतरली आहे, साताऱ्यातील भाजी मंडईतून भल्या सकाळी तिने प्रचाराला सुरुवात केली.
मृणालीराजे पहिल्यांदाच राजकारणात उतरली आहे. छत्रपती घराण्यातील चौथ्या पिढीनेही आता राजकारणाचा विडा उचलला आहे आणि प्रचाराला सुरुवात केली आहे.
सकाळी कार्यकर्त्यांसमवेत भाजी मंडईत येऊन शिवेंद्रराजेंच्या कन्येने भाजीवाल्यांशी संवाद साधला.
बाबा बहुमताने निवडून यावा यासाठी लेक रणांगणात उतरली आहे, याआधी मृणालीराजे राजकारणापासून दूर होती.
शिवेंद्रराजेंना तुमचं मोलाचं मत द्या, असं आवाहन तिने भाजीवाल्यांना केलं.
प्रचारादरम्यान मृणालीराजेने शिवेंद्रराजेंच्या चिन्हाचं आणि माहितीचं पॅम्पलेट सर्वांना दिलं.
सातारा विधानसभेसाठी महायुतीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले, ठाकरे गटाचे अमित कदम, रिपाइंमधून (आठवले गट) हणमंत तुपे तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
साताऱ्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाही रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं.
वडिलांच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच मुलगी मृणालीराजे राजकारणाच्या आखाड्यात उतरली आहे.