Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'ची तिजोरी आणली; दोन पोस्टर काढले अन्..., राहुल गांधींनी पत्रकार परिषद गाजवली, Photo

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार असून आज संध्याकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत.

Rahul Gandhi

1/9
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (Image Credit- Rahul Gandhi)
2/9
भाजपच्या 'एक है तो सेफ है' याची राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. (Image Credit- Rahul Gandhi)
3/9
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत 'एक है तो सेफ है'ची तिजोरी आणली. (Image Credit- Rahul Gandhi)
4/9
राहुल गांधींनी आणलेल्या या तिजोरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींचा फोटो होता.(Image Credit- Rahul Gandhi)
5/9
सदर तिजोरीत धारावीचा देखील एक पोस्टर होता. हे दोन्ही पोस्टर राहुल गांधींनी पत्रकार परिषेदत दाखवले. (Image Credit- Rahul Gandhi)
6/9
राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. (Image Credit- Rahul Gandhi)
7/9
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार असून आज संध्याकाळी पाच वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. (Image Credit- Rahul Gandhi)
8/9
महाराष्ट्राची निवडणूक हा मुद्दांची निवडणूक आहे. अरबपत्ती आणि सर्वसामान्य लोकांची ही निवडणूक आहे. यांना मुंबईतील जमीन पाहिजे. आमचा फोकस महिलांन मदत करण्याच आहे. महिलेच्या खात्यात 3 हजार रुपये पोहचले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. जातीयगणना झाली पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.(Image Credit- Rahul Gandhi)
9/9
गरिबांना आरोग्य विमा 25 लाखाला मिळाला पाहिजे.युवकांना बेरोजगारी भत्ता 4 हजार रुपये मिळेल. 50 टक्के आरआरक्षण मर्यादा हटवली पाहिजे. अदानी यांचा धारावीवरील डोळा ⁠हा विषय आहे, असं राहुल गांधींनी सांगितले. (Image Credit- Rahul Gandhi)
Sponsored Links by Taboola