पंजाबच्या जनतेचा आपला 'मान', मुख्यमंत्र्यांसह या दिग्गजांचा झाला पराभव
Punjab Election Result 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागांवर आपने बाजी मारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी यांचाही पराभव झाला आहे. अमृतसर सेंट्रल या विधानसभ मतदार संघातून अजय गुप्ता यांनी ओम प्रकाश सोनी यांचा पराभव केला आहे. ओम प्रकाश सोनी अमृतसह सेंट्रलमधून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2007,2012 आणि 2017 मध्ये ओम प्रकाश सोनी यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता आपच्या त्सुनामीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
पंजाब काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून सिद्धू पराभूत झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आपच्या अजीतपाल सिंह कोहली यांनी तब्बल 15000 हून अधिक मतांनी धुळ चारली आहे
शिरोमणी अकाली दलचे नेता सुखबीर सिंह बादल यांचा जलालाबाद मतदार संघात 16 हजार मतांनी पराभव झाला. आप पक्षाच्या जगदीप कंबोज यांनी केला पराभव
अकाली दलाचे विक्रम सिंह मजीठिया यांचाही पराभव
सून सूदची बहिण मालविका सूद यांना पजांब विधानसभा निवडणूकीत पराभवाचा धक्का बसला आहे. आपच्या डॉक्टर अमनदीप कौर आरोरा यांनी मालविका सूद यांचा पराभव केला.