तिकीटाचा अत्यानंद; गुडघ्यावर बसले, डोकं टेकवलं पुण्यात उमेदवाराने घेतले चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद

भाजप असो किंवा शिवसेना, उमेदवारांच्या पहिल्या यादीची प्रतिक्षा होती. मात्र, भाजपने कुठलीही यादी जाहीर न करता उमेदवारांना फोन करुन उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले.

Continues below advertisement

Pune BJP ganesh bidkar viravl photo

Continues below advertisement
1/8
भाजप असो किंवा शिवसेना, उमेदवारांच्या पहिल्या यादीची प्रतिक्षा होती. मात्र, भाजपने कुठलीही यादी जाहीर न करता उमेदवारांना फोन करुन उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले.
2/8
महापालिका निवडणुकांसाठीच्या भाजपच्या या खेळीची सर्वत्र चर्चा होत असून अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. तर, ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना अत्यानंद झालाय.
3/8
भाजपकडून महापालिका निवडणुकांसाठी आज पुण्यात उमेदवारी भरण्याचा पहिला मान मिळाला तो पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांना.
4/8
भाजपने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कुठलीही यादी जाहीर न करता निश्चित केलेल्या उमेदवारांना थेट फोन करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज परवानगी दिली. त्यामुळे, अनेकांनी धावाधाव झाली.
5/8
भाजपचे पुणे शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आज वार्ड क्रमांक 24 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार हेमंत रासने उपस्थित होते.
Continues below advertisement
6/8
आपला उमेदवारी फॉर्म भरण्यापूर्वी बिडकर यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधलं. बिडकर हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात फॉर्म भरण्यासाठी आले असता त्याठिकाणी चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
7/8
उमेदवार बिडकर यांनी चप्पल काढत थेट गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटील यांच्या पायावर डोकं ठेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं. मात्र, आपल्या उमेदवारास विजयी भवं असा आशीर्वादही त्यांनी दिली.
8/8
दरम्यान, पुण्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असून भाजपला काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे आव्हान असणार आहे.
Sponsored Links by Taboola