देवेंद्र फडणवीसांसोबत गडकरी, सामंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, तटकरेंसोबत गोगावले; कुठून भरले अर्ज
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावात शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. आपण वैशाली सूर्यवंशी यांचा अर्ज भरण्यासाठी आलो आहोत, त्या विजयी होतील असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीच्या महिला नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.श्रीवर्धन म्हसळा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला, त्यांच्यासमवेत शिवसेना नेते भरत गोगवले हेही उपस्थित होते.
आदिती तटकरे या महिला व बालकल्याणमंत्री असून लाडकी बहीण योजनेंची अंमलबजावणी त्यांच्या नेतृत्वात राज्यभरात करण्यात आलीय.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही त्यांच्यासमवेत अर्ज भरताना होते
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एक्सवर ट्रेंडिंगमध्ये आहेत. एक्सच्या ट्रेंडवर #DevaBhau चा जोरदार ट्रेंड दिसून येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती हतोी. तर, येतील सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना उचलून घेतले