Bihar Election : बिहार निवडणुकीत विजयी झालेली मैथिली ठाकूर नेमकी आहे तरी कोण?

Bihar Election : बिहारच्या अलीनगरमध्ये लोकांची मने जिंकणारी मैथिली ठाकूर सर्वात तरुण विधायिका म्हणून विजयी ठरली.

Continues below advertisement

Bihar Election

Continues below advertisement
1/9
बिहार निवडणूक निकालांमध्ये अलीनगर मतदारसंघात मैथिली ठाकूरने वयाच्या पंचवीशीत असताना बिहारमधील सर्वात तरुण आमदार झाली.
2/9
मैथिली तब्बल 11 हजार 730 मतांनी विजयी झाली आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का राजकारणात येण्याआधीच मैथिली यशाच्या शिखरावर होती.
3/9
मैथिलीचा जन्म एका संगीताशी संबंधित कुटुंबात झाला. तिचे आजोबा आणि वडिलांनी तिला भारतीय शास्त्रीय संगीताचे उत्तम प्रशिक्षण दिले.
4/9
तिच्या प्रतिभेमुळे तिचे कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. लहान वयातच मैथिलीने जागरण आणि सांगीतिक कार्यक्रमांमध्ये गाणं गायला सुरुवात केली.
5/9
लिट्ल चॅम्प्ससारख्या कार्यक्रमांमध्ये तिने आपली कला दाखवली. किशोरवयात ती लोकप्रिय गायन स्पर्धेतही झळकली.
Continues below advertisement
6/9
या दरम्यान सोशल मीडियावर ती झपाट्याने लोकप्रिय झाली. तिचे गायन लाखो लोकांनी ऑनलाईन पाहिले.फेसबुक आणि युट्यूबवर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी झाली.
7/9
तिने अनेक संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तिच्या मेहनतीने आणि सातत्यामुळे आपली ओळख अधिक बळकट झाली. संगीत क्षेत्रातील अनुभवामुळे लोकांमध्ये तिचा प्रभाव वाढत गेला.
8/9
कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे तिने लहानपणापासून गायनात स्वतःला झोकून दिलं. तिच्या आवाजातील सहजता आणि भावनेमुळे ती लोकांची आवडती झाली.
9/9
सामाजिक माध्यमांवरील तिच्या उपस्थितीने प्रगतीला नवी दिशा दिली. या सर्व प्रवासामुळे ती राजकारणातही मजबूतपणे उभी राहू शकली.
Sponsored Links by Taboola