Pune Bypoll Elections: पुण्यात गुलाल कुणाचा? कसबा, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे.
पुणे पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
मतमोजणीच्या पहिल्या कलापासूनच कसब्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
चिंचवड आणि कसब्यात मतमोजणीसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
निवडणूर निकालांत गुलाल कोणाचा उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कसबा आणि चिंचवडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.