राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
यंदाची विधानसभा प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अतितटीची आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीत मनसे स्वबळावर लढत आहे. एवढंच काय तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चिरंजीव अमित ठाकरेंनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच मनसैनिकांकडून तसेच, सर्वसामान्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातली जात आहे. सर्वसामान्यांनी राज ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं, अशी इच्छाही बोलून दाखवली आहे.
अशातच अॅक्सिक माय इंडियाच्या सर्व्हेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातील जनता कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती देणार? हे समोर आलं आहे.
अॅक्सिक माय इंडियाच्या सर्व्हेनुसार, राज्यातील दोन टक्के लोकांना पुढील पाच वर्षांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतंय.
याशिवाय केवळ 5 टक्के लोकांनी शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे.
या सर्वेक्षणात 12 टक्के लोकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपली पसंती असल्याचं जाहीर केलं आहे.
अॅक्सिक माय इंडियाच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना सगळ्यात जास्त पसंती देण्यात आली आहे. शिंदेंना सगळ्यात जास्त 31 टक्के मतं मिळाली आहेत. तर, देवेंद्र फडणवीसांना 12 टक्के, उद्धव ठाकरेंना 18 टक्के तर शरद पवारांना 5 टक्के मतं मिळाली आहेत.
अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला 178 ते 200 जागा तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
(वरील माहिती केवळ सर्व्हेवरुन देत आहोत, एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)