MNS Candidate List :अमित ठाकरेंना उमेदवारी, शिवसेना अन् उद्धव ठाकरेंपुढं पेच, राज ठाकरेंच्या एका निर्णयाचा माहीम अन वरळीवर परिणाम
MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अमित ठाकरेंना देखील स्थान देण्यात आलं आहे.
Continues below advertisement
मनसेची विधानसभेसाठी दुसरी यादी
Continues below advertisement
1/5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
2/5
माहीममधून अमित ठाकरे आणि वरळीतून आदित्य ठाकरेंच्या उमेदवारानं राजकीय समीकरणं बदलणार आहेत. राज ठाकरे यांनी वरळीतून यावेळी संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.
3/5
2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेनं माघार घेतली होती. त्यानंतर 2024 ला संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली होती.
4/5
अमित ठाकरे माहीम विधानसभा निवडणूक लढवणार असल्यानं शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. माहीम विधानसभेत सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत.
5/5
अमित ठाकरे यांच्या उमेदवारीनं शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष माघार घेणार का याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. वरळीत आदित्यसाठी मनसे माघार घेणार का हा देखील प्रश्न विचारला जात आहे.
Continues below advertisement
Published at : 22 Oct 2024 10:51 PM (IST)