Vidhan Sabha Elections 2024 : मनसेच्या उमेदवारांना ओवाळलं; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ओवाळणी नको, आमदारकी हवी!
महाराष्ट्र विधानसभेसाठी मनसेची आणखी एक उमेदवार यादी जाहीर झाली आहे, यानंतर शर्मिला ठाकरेंनी सर्व मनसे उमेदवारांचं औक्षण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी शर्मिला ठाकरेंनी सर्व उमेदवारांना ओवाळून त्यांचं अभिनंदन देखील केलं.
'ओवाळणीत एकही रुपया नको, पण आमदारकी पाहिजे' असं शर्मिला ठाकरेंनी सर्व मनसे उमेदवारांना खडसावून सांगितलं.
बाळा नांदगावकरांचं देखील शर्मिला ठाकरेंनी औक्षण केलं.
उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यावर मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
त्यातच अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्याने मनसेमध्ये उत्साहाचं वातावऱण आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर पत्नी मिताली ठाकरेने अमित ठाकरेंचं औक्षण केलं.
सर्व मनसेच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
मनसे उमेदवारांनी राज ठाकरे आणि कुटुंबाचे आशीर्वाद देखील घेतले.
अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसैनिकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याच वेळी बाकी उमेदवारांचं देखील औक्षण करण्यात आलं.
निवडून आल्यावर माहीम-दादरमधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मी मार्गी लावणार, असं अमित ठाकरेंनी म्हटलं.