Lok Sabha Election Results 2024 : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच बोलबाला; 'ही' आहे विजयी उमेदवारांची यादी
हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर पराभूत झाले आहेत.
मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.
शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे.
शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत, तर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे पराभूत झाले आहेत.
साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे पराभूत झाले आहेत.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाले आहेत. तर भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी झाले आहेत, तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे पराभूत झाले आहेत.
पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत झाले आहेत.
कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज विजयी झाले आहेत. तर शिंदे गटाचे संजय मंडलिक पराभूत झाले आहेत.
दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले आहेत. तर भाजपच्या भारती पवार पराभूत झाल्या आहेत.