Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hyundai Creta, Venue सह महागल्या तुमच्या आवडीच्या 'ड्रीम कार', जाणून घ्या नवे दर
वोक्सवॅगन - सर्वच कारचे दर वाढत असताना इथं वोक्सवॅगन पोलो आणि वेंटो या कारच्या दरांतही 2.5 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRenault - नव्या वर्षात रेनॉल्ट कंपनीकडूनही कारच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध मॉडेल्सवर जवळपास 28 हजार रुपयांच्या घरात हे दर वाढले आहेत.
Nissan - यंदा निसान आणि डॅटसन या ब्रँडकडूनही कारच्या दरांत वाढ होणार आहे. जवळपास 5 टक्क्यांपर्यंत ही दरवाढ होणं अपेक्षित आहे.
नव्या वर्षात, अर्थात 2021 मध्ये अनेक वस्तूंचे दर वाढलेले असतील, किंबहुना ही दरवाढ लागूही झाली आहे. यातच कारचाही समावेश आहे. अनेक कंपन्यांच्या कारच्या दरांच 7500 पासून 33 हजार रुपयांपर्यंतची दरवाढ झाली आहे. BS6 ऩॉर्म्स लागू झाल्यानंतर कंपन्यांना जुनी BS4 वाहनं परत घेऊन त्यांना रिप्लेस करावं लागत असल्यामुळं यामध्ये कंपनीलाच मोठ्या खर्चाचा फटका बसत आहे. त्यातच कोरोना महामारीमुळं ओढावलेलं संकट ही दुसरी बाब. त्यामुळं मागील वर्षी कार कंपन्यांना प्रचंड तोटा झाला होता. तेव्हा यंदाच्या वर्षी ऑटो क्षेत्राला काहीसा वेग देण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. पण, यामुळं कार खरेदी करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्वसामान्यांना मात्र याची झळ बसणार हे नक्की...
Hyundai Venue- कंपनीनं मिड रेंज सिडॅन verna च्या दरांत 32,880 नं वाढ केली आहे. भारतात सध्या तिचे दर 9.03 लाखांपासून 15.19 लाखांपर्यंत आहेत. तर, ह्युंडाई वेन्यूची किंमत 25,672 नं वाढली आहे. भारतात ही कार 6.76 लाखांपासून 11.66 लाखांच्या दरात उपलब्ध आहे. शिवाय Hyundai Auraची किंमतही 11,745 रुपयांनी वाढवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
Hyundai Hatchback car- नव्या वर्षात कंपनीनं सँट्रो कारचे दर 9,112 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळं आता तुम्ही ही कार 4.64 लाख रुपयांपासून 6.32 लाख रुपयांपर्यंत खरेदी करु शकता. याशिवाय आय10 NIOS च्या दरा 8,652 रुपये आणि सीएनजी कारच्या दरात 14,556 रुपयांची वाढ झाली आहे.
Hyundai Creta- ह्युंडाईनं सर्वाधिक खप होणाऱ्या मिड साईज SUV Cretaची किंमत 27,335 रुपयांनी वाढवली आहे. भारतात ह्युंडाई क्रेटाची किंमत 9.28 लाख रुपयांपासून सुरु होऊन हे दर 17.33 पर्यंत वाढत जातात. याशिवाय कंपनीनं एसयूव्ही Tucson आणि इलेक्ट्रिक एसयूवी Kona Electric या कारच्या दरांतही वाढ केल्याचं म्हटलं जात आहे. ज्याबाबत सविस्तर माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -