Fadnavis Delhi Daura Photos : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात 7 नेते, 5 मूर्ती !
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा होता, या दरम्यान फडणवीसांनी सर्व बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतील या सदिच्छा भेटीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अनोखं दर्शन फडणवीसांनी घडवलं.
देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 7 नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या.
फडणवीसांनी यात 5 वेगवेगळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना फडणवीसांनी विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती दिली.
फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांची मूर्ती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली प्रचाराची सुरुवात रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन केली. मोदी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात, म्हणून त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची मूर्ती दिली.
भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती तर केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि नितीन गडकरींना सिद्धीविनायकाची मूर्ती दिली.
महाराष्ट्रात सत्ता विस्ताराची सर्व सूत्र ठरली असल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलं.