Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यातील यंदाच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले, गेल्या 30 वर्षातील निवडणुकांचा आढावा घेतल्यास यंदा सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसन 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 65.10 टक्क्यांपर्यंत गेल्याचे समजते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52.07 टक्के मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे यंदाही ग्रामीण भागातच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले असून शहरी भागात अपेक्षेनुसार मतदान झालंच नाही. मुंबई जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाल आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात झालं आहे. तर, सर्वात कमी मतदान हे मुंबईतील वर्सोवा मतदारसंघात झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक 83.93 टक्के मतदान झालं असून मुंबई उपनगरातील सर्वोवा मतदारसंघात केवळ 42.35 टक्के मतदान झालं आहे.
मतदानाची ही टक्केवारी पाहिल्यास मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर येथील मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लोकं मतदानापासून वंचित आहेत, त्यामुळे सुशिक्षित व उच्चवर्गीय असूनही लोकशाहीचं कर्तव्य बजावताना ते मागास असल्याचे दि
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -