आमचा राम राम घ्यावा! शिदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!
एकनाथ शिंदेंनी आज आपला महाराष्ट राज्याचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा कडे सोपवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.
आज दि. 26 नोव्हेंबर 2024 हि विधानसभा कार्यकाळची शेवटची तारीख असल्याने हा राजीनामा सोपवण्यात आला आहे.
नवीन सरकार स्थापन होई पर्यंत एकनाथ शिंदेच कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार आहे.
एकनाथ शिंदेंचा राजीनामानंतर नवीन सरकारचा सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर रहावे अशी मागणी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करत आहे तर भारतीय जनता पार्टी मुख्यामंत्री पदासाठी जोर लावत असल्याचं चित्र दिसत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण याबद्दलची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्ला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवतांना दीपक केसरकर, दादा भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते.