तुमचं मतदार यादीत नाव आहे का? घरबसल्या काही मिनिटांत करा तपासणी!

मतदार यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला वोट देता येणार नाही. या पद्धतीने तुम्ही यादीतील नाव तपासू शकता.

Continues below advertisement

Voter List

Continues below advertisement
1/9
मतदान करताना फक्त मतदान कार्ड पुरेसं नसतं,मतदान यादीत तुमचं नाव आहे की नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
2/9
यादीत नाव असणं महत्वाचं का आहे?मतदान कार्ड असूनही तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदान करण्याआधी आपलं नाव यादीत तपासणं आवश्यक आहे.
3/9
अनेकदा असं होतं की मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यावर कळतं यादीत आपलं नावच नाहीये.
4/9
यादीतील तुमचं नाव कस तपासता येईल?तुम्ही 2 मिनिटांत ऑनलाइन पद्धतीने सहज मतदार यादीतील तुमचं नाव तपासू शकता.
5/9
यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि तुमच नाव तपासा.
Continues below advertisement
6/9
यादीत नाव शोधण्यासाठी संकेतस्थळावर ही माहिती भरा.
7/9
नाव,वडिलांचे/पतीचे नाव,राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ,वय/जन्मतारीख आणि लिंग.
8/9
तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर फक्त EPIC नंबर आणि राज्य टाकून थेट यादीत नाव शोधणं सोप आहे.
9/9
सर्व माहिती भरल्यानंतर Search वर क्लिक करा. तुमच नाव यादीत असेल तर स्क्रीनवर तुमची माहिती दिसेल.
Sponsored Links by Taboola