Sada Sarvankar On Amit Thackeray: मनसेने फक्त ते एक काम करावं, मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहीम विधानसभेतील मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.
तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे.
सदा सरवणकर यांना वारंवार निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, असा प्रश्न माध्यमांकडून विचारला जातोय.
मात्र निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे, असं सदा सरवणकर म्हणाले.
तसेच मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत, असं सदा सरवणकर म्हणाले.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, असं विधान सदा सरवणकर यांनी केलं.
पक्षासाठी त्याग करण्यासाठी तयार आहे, मात्र मनसेने महायुतीविरोधात उभे केलेले सर्व उमेदवार मागे घ्यावे असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.