विद्यार्थ्यांनी वाचावीत अशी प्रेरणादायी पुस्तकं.
श्यामची आई (साने गुरुजी) : एका आई-मुलाच्या निर्मळ नात्याच हे पुस्तक. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमन मै है विश्वास ( विश्वास नांगरे पाटील ) : आपलं ध्येय गाठताना अनेक चढ उतार येतात, काहीवेळा आपण निराश होतो. या सर्वांवर मात करत पुढे कसं जायचं हे या पुस्तकातून कळत.
द सायकॉलॉजी ऑफ मनी ( मॉर्गन हाऊसेल ) : या पुस्तकातून पैशाचे मानसशास्त्र आणि मानवी वर्तन यावर भाष्य करते.
लर्निंग हाऊ टू फ्लाय ( डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ) : आपले आयुष्य योग्यरित्या घडवण्यासाठीचे उत्तम धडे या पुस्तकातून मिळतात.
ऍटोमिक हॅबिटस् ( जेम्स क्लियर ) : या पुस्तकातून सवयींबद्दलची व्यावहारिक धोरणे प्रकट केली आहेत.
शाळा ( मिलिंद बोकील ) : मुलांना किशोरवयीन किंवा पौगंडावस्थेच्या अवस्थेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये होणारे बदल या पुस्तकातून व्यक्त होतात.
द अल्केमिस्ट ( पाउलो कोएल्हो ) : हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय शोधण्यास मदतशीर ठरू शकते.
अग्निपंख ( डॉ. ए पी जे अब्दुल कलाम ) : अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
वाईज अँड अदरवाईज ( सुधा मूर्ती ) : स्त्री पुरुषांचे वागणे यांवरचे बारीक आणि मार्मिक चित्रण यात येते.
हाऊ टू विन फ्रेंड अँड इन्फ्लुएन्स पीपल ( डेल कार्नेगी ) : या पुस्तकातून तुमच्या विचारसरणीने लोकांना कसे जिंकता येईल आणिमचांगला माणूस कसा बनता येईल हे स्पष्ट केले आहे.