Jalna Hsc Exam Copy : जालना जिल्ह्यातील 12 वीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट
जालना जिल्ह्यात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. मंठा तालुक्यातील एका महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय. कोणी शाळेच्या भिंतीवर, तर कोणी झाडावर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. आज बारावी रसायनशास्त्राचा पेपर असून, या परीक्षा केंद्रावर खिडक्यांमधून सर्रास कॉपी पूरवतानाच दृश्य पाहायला मिळाले.(Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा अक्षरशः खच पडला होता. तर, केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतांना देखील बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात आहेत. त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले भरारी पथक आहेत तर कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. सोबतच कॉपीमुक्त अभियानाला केराची टोपली दाखवल्या जात असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. (Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर पाठीमागून काही तरुण थेट भिंतीवर चढतांना पाहायला मिळत आहे. (Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
जीव धोक्यातघालून हे तरूण वरती चढत आहेत. तर, काहीजण झाडावर चढून परीक्षा केंद्रात कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सर्व जीवघेणा प्रकार पोलिसांच्या समोर सुरु होता. पोलिसांकडून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांना हाकलण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, याच कोणताही परिणाम होतांना दिसला नाही. (Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
जालना जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी व परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या करीता जालना जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अशा 26 अधिकाऱ्यांचा समावेश असलेले नियंत्रण पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले.(Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
तसेच या कार्यालयामार्फत भरारी पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाहय उपद्रव होणार नाही या दुष्टीकोनातून पुरेसा बंदोबस्त ठेवण्याबाबत व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात यावी असे निर्देश दिले गेले आहेत.(Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)
तसेच परीक्षा केंद्र प्रमुख पर्यवेक्षक, बैठे पथक भरारी पथक यांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. मात्र, असे असतांना बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Photo Credit : ABP Majha, Jalna Reporter)