Job : मुलाखतीला जाताना तुमच्या Resume मध्ये 'या' गोष्टी असायलाच हव्यात; तुमची निवड झालीच म्हणून समजा
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नोकरी करा. मुलाखतीला मात्र तुमचा Resume जर आकर्षक नसला तर त्याचा परिणाम तुमच्या मुलाखतीवर पडू शकतो. Resume हा तुमच्या मुलाखतीच्या प्रक्रियेतलाच एक महत्त्वाचा भाग असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमचा Resume अधिक आकर्षक करण्यासाठी Aspiration Job Matters यांनी काही स्टेप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा Resume इतरांपेक्षा अधिक चांगला दिसेल.
तुमचा Resume समोरच्या व्यक्तीने का वाचावा हे वाचकाला लगेच कळायला हवे. शीर्षकात तुम्ही कोण आहात आणि तुमच्या कामाची नेमकी ओळख काय याची स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे.
तुम्ही ज्या क्षेत्रांत आतापर्यंत काम केले आहे. त्या कामाची ओळख पटवून देणारे विशेष पुरावे तुमच्या Resume मध्ये असू द्या. म्हणजेच लिंक, फोटो, कॉन्टेंट, व्हिडीओ इ. थोडक्यात तुमच्या आतापर्यंतच्या achievements चा उल्लेख असू द्या.
तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडत असतील मात्र ठराविक तीन विशेष क्षेत्र अशी निवडा की ज्यामध्ये तुम्हाला मनापासून काम करायला आवडेल. यामुळे तुमचा उद्देश स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो.
तसेच, तुम्ही कोणती कामे करू शकता. कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडू शकता याचा देखील उल्लेख तुमच्या Resume मध्ये असणं गरजेचं आहे. तुमची strength सांगणं गरजेचं आहे.
मुलाखतकाराला सुरळीत वाचता येईल असा फॉन्ट निवडा. आणि तोच संपूर्ण Resume मध्ये असू द्या. सतत फॉन्ट बदलत राहिल्याने मुलाखतकार गोंधळात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
लक्षात ठेवा तुम्ही आजवर कितीही कामे केली असतील तरी मात्र तुमचा Resume हा दोन पानांपेक्षा जास्त मोठा नसावा. यामुळे समोरच्या व्यक्तीला ठराविक काळानंतर तो वाचायला कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तो सोपा आणि सुटसुटीत असावा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे Resume मध्ये चुका टाळा. यामुळे तुमच्या एकंदर कौशल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे तुमची नोकरीही धोक्यात येऊ कते.