Tuljapur News : तुळजापुरात दोन गटात झालेल्या राड्यानंतर हवेत गोळीबार; फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल; दोन संशयितांना अटक
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या तुळजापुरात (Tuljapur) दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Continues below advertisement
Tuljapur News
Continues below advertisement
1/8
Tuljapur News : तुळजापूर (Tuljapur) जिल्ह्यात दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी आणि गोळीबारीच्या घटनेबाबत नवी माहिती समोर आली आहे. दोन गटात झालेल्या राड्यातून हवेत गोळीबार झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तर गोळीबार प्रकरणानंतर दोन संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
2/8
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिटू गंगणे आणि काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांच्या दोन गटात हा राडा झाला.
3/8
दोन गटातील राड्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळ, गर्दीचे ठिकाणं आणि काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढण्यात आली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
4/8
या राड्यात अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे जखमी झाले असून सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
5/8
तर दुसरीकडे तुळजापुरातील गोळीबार, कोयत्याने हल्ला प्रकरणाला आता 18 तास उलटून गेल्यानंतर ही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सोबतच दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचीही माहिती आता पुढे आली आहे.
Continues below advertisement
6/8
त्यामुळे तुळजापुरात पोलिस सुमोटो कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
7/8
एकीकडे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे.
8/8
अशातच या दोन गटातील राड्यानंतर तुळजापुरातील राजकीय वातावरण अजून तापल्याचे बघायला मिळते आहे.
Published at : 17 Dec 2025 01:00 PM (IST)