Pune Crime News: चोरीचा चांदीचा मुकुट देवीला परिधान केला, पुन्हा त्याच रात्री चोरीला गेला; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime News: पोलिसांनी चांदीचा मुकुट देवीला परिधान केला आणि रात्रीत पुन्हा चोरांनी मुकुट लंपास केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Continues below advertisement

Pune Crime News
Continues below advertisement
1/5
Pune Crime News: पोलिसांनी चांदीचा मुकुट देवीला परिधान केला आणि रात्रीत पुन्हा चोरांनी मुकुट लंपास केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2/5
पुण्यातील तळेगाव दाभाडेत पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला आणि त्याच रात्री चोरट्यांनी पुन्हा तोचं चांदीचा मुकुट लंपास केला. त्यामुळे चोरट्यांमध्ये कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
3/5
तळेगावमधील तुळजाभवानी मातेचा सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता.
4/5
पुजाऱ्या देखत मुकुट लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काल 12 जूनच्या सकाळीच पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला.
5/5
स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी पोलिसांनी मोठा गाजावाजा केला. पण 24 तास उलटायच्या आत चोरट्यांनी पुन्हा त्याचं चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे राहिले आहे.
Continues below advertisement
Published at : 13 Jun 2026 10:03 AM (IST)