Swargate Bus Depot News: स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार करणारा दत्ता गाडे समलैंगिक?; पोलिसांना म्हणाला...
Swargate Bus Depot News: स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्थानकावर जाऊन सावज शोधायचा अशी माहिती समोर आली.
Continues below advertisement
pune bus depot marathi news
Continues below advertisement
1/9
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला.
2/9
बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट गावातून मध्यरात्री अटक केली.
3/9
पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
4/9
स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टॅंडवर जाऊन सावज शोधायचा अशी माहिती समोर आली.
5/9
दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली गाडे याने दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होतं.
Continues below advertisement
6/9
दत्ता गाडेने याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केला केला असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
7/9
आरोपीबाबत अनेक वावड्या उठल्या आहेत. दत्ता गाडे समलैंगिक असून, त्याद्वारे तो पैसे मिळवायचा. यापूर्वी आरोपी दत्तात्रय याने पोलिसांना तृतीयपंथी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
8/9
बायको-मुलं असलेला दत्ता गाडे याला बचाव कसा करायचा, याबाबत चांगलीच माहिती असून तो शातीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
9/9
आरोपी दत्ता गाडेचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी माध्यामांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला. बलात्कार झालाचं नाही. जे झालं ते दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासुन ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, असं आरोपी दत्ता गाडेचे वकीलांनी सांगितले. तसेच दोघांमध्ये पैशाचा वाद झाला. दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला. गावाला पोलीस छावणीचे रुप आल्याने तो दडून बसला, अशी माहितीही दत्ता गाडेचे वकीलांनी दिली.
Published at : 02 Mar 2025 01:38 PM (IST)