ह्रदयद्रावक... शिर्डीत बापाने 4 मुलांसह घेतली विहिरीत उडी; हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर

एकीकडे दहीहंडी उत्सवाचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत असून मुंबईसह राज्यभरात गोपाळकाला, गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला जात आहे. त्यातच, राहत्यामधून दु:खद घटना समोर आली आहे.

Continues below advertisement

Shirdi rahta 4 death drowned well

Continues below advertisement
1/7
एकीकडे दहीहंडी उत्सवाचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत असून मुंबईसह राज्यभरात गोपाळकाला, गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला जात आहे. त्यातच, राहत्यामधून दु:खद घटना समोर आली आहे.
2/7
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली असून एकाच कुटुंबातील 5 जणांनी आपलं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे, वडिलांनी आपल्या लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. एका शेताच्या बाहेर दुचाकी लावल्याचंही पाहायला मिळालं.
3/7
बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या 4 अपत्यांसह जीवन संपवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
4/7
राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात निर्दयी बापाने मुलांना विहिरीत ढकलून स्वत: आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अरुण काळे (वय 30 वर्षे) राहणार चिखली कोरेगाव, तालुका श्रीगोंदा असे बापाचे नाव आहे.
5/7
अरुण काळेने आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह विहिरी उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.अद्यापही दोन जणांचा विहिरीत शोध सुरू आहे.
Continues below advertisement
6/7
एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळे यांचा मृतदेह आढळला असून स्वत: हात पाय बांधून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
7/7
शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6), कबीर अरुण काळे (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादा-वादीमुळे बायको 8 दिवसांपूर्वीच येवला येथे माहेरी गेली होती.
Sponsored Links by Taboola