Santosh Deshmukh Case: अचानक अज्ञात महिला आली, देशमुखांच्या बाथरुममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट; कृष्णा आंधळेचंही नाव घेतलं!
Santosh Deshmukh Case: पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेने धाव घेतल्याचं समोर आलं.
Continues below advertisement
Santosh Deshmukh Case
Continues below advertisement
1/9
बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यातील सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
2/9
पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेने धाव घेतल्याचं समोर आलं.
3/9
महत्वाचं म्हणजे या महिलेनं कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा खळबळजनक दावा देखील केला.
4/9
रात्रभर येथील घरासमोर असलेल्या मंडपात त्यांनी आराम केल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट महिलेनं केला. त्यामुळे, काही काळ देशमुख कुटुंबीयांमध्येही शंका आणि गोंधळ निर्माण झाला होता.
5/9
सकाळी, अंघोळीसाठी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं, अशी मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची, असा तिचा हट्ट होता.
Continues below advertisement
6/9
कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तिने केला. मात्र, पोलीस आल्यानंतर आपलं नाव सांगण्यास देखील नकार दिला.
7/9
सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही धनंजय देशमुख यांनी म्हटलं.
8/9
धनंजय देशमुख काय म्हणाले?-मला कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं की, एक महिला घरी आलेली आहे, तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे, आम्ही याबाबत गावकरी व पोलिसांना कळवलं होतं. तसेच, रत्नागिरी पोलिसांनाही आम्ही याबाबत माहिती दिली. तेव्हा रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेनं इथं तशाप्रकारच्या तक्रारी दिल्या आहेत. पण, आम्ही त्याची शहानिशा करत असल्याचं म्हटलं आहे.
9/9
महिलेनं सकाळी अंघोळ करायचं म्हटल्यानंतर त्यांची इतरत्र सोय करण्यात आली. पण, त्यांनी आमच्या घरीच अंघोळ करायचा आग्रह केल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, रात्रभर त्या इथंच थांबलेल्या होत्या, त्यांच्या सोबतील महिला पोलीस कॉन्स्टेबलही होत्या, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
Published at : 22 Apr 2025 07:27 AM (IST)