Santosh Deshmukh Murder Case: पाईप फुटला, 15 तुकडे झाले, तरीही आरोपी थांबले नाही; संतोष देशमुख प्रकरणातील अत्यंत भयानक पुरावा समोर

Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीनं आरोपींचे पाच मोबाईल हस्तगत केले होते. त्यातला एक फोन केदार नावाच्या आरोपीचा होता.

Santosh Deshmukh Murder Case

1/8
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं.
2/8
संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो समोर आले. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत.
3/8
कपडे काढून संतोष देशमुखांच्या जीव जाईपर्यंत मारले, व्हिडीओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे.
4/8
संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवलं आणि पाईपचे 15 तुकडे पडेपर्यंत मारण्यात आलं आहे. पाईपच्या तुकड्यावरून ही मारहाण किती क्रूरपणे झाली याचा अंदाज येत आहे.
5/8
संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता. प्रतीक आणि सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता.
6/8
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता.
7/8
सीआयडीनं आरोपींचे पाच मोबाईल हस्तगत केले होते. त्यातला एक फोन केदार नावाच्या आरोपीचा होता.
8/8
महेश केदारच्या मोबाईलचं स्क्रीन लॉक उघडलं तेव्हा सीआयडीला 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढल्याचे समोर आलं आहे.
Sponsored Links by Taboola