राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले

Raja Raghuwanshi Case: सोनम रघुवंशीसह चार अन्य आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. मेघालय पोलिस त्यांना आपल्या ताब्यात घेऊन गेले आहेत.

Raja Raghuwanshi Case

1/7
इंदौरमधल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा आहे. मधूचंद्रासाठी गेलेले राजा आणि सोनम बेपत्ता झाले. नंतर राजा रघुवंशीचा आपला प्रियकर राज आणि इतर दोन मारेकऱ्यांच्या सोबतीनं सोनमनं खून केला.
2/7
या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. यात पत्नी सोनमने उत्तरप्रदेशच्या गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केलं. सोनमनं आपलं अपहरण झाल्याचा बनाव केला. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही आणि सोनमच्या चॅट्समधून वेगळंच समोर आलं.
3/7
लग्नाच्या तीन दिवसांनंतरच सोनमनं राजा रघुवंशीला ठार मारण्याची योजना आखली. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या चॅट्समधून दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं.
4/7
या चॅट्समध्ये राजा माझ्या जवळ येत आहे, हे मला आजीबात आवडत नसल्याचं सोनम प्रियकर राज कुशवाह याला सांगत असल्याच्या चॅट्स समोर आल्या आहेत.
5/7
सोनम आणि राजाचा विवाह 11 मे रोजी इंदौरमध्ये झाला.20 मे रोजी ते मेघालयला रवाना झाले आणि 23 मे रोजी बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला.
6/7
राजाच्या शवविच्छेदनात त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार झाल्याचं समोर आलं. सोनम गाझीपूरला कशी पोहोचली? याचा तपास पोलीस करत आहेत. यातही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास सुरु आहे.
7/7
सोनमनं राजा रघुवंशीला मारण्यासाठी राज कुशवाहासोबत आणखी दोघांना सुपारी दिली. या सगळ्या घटनाक्रमामध्ये आता आणखी नवनवे धक्कादायक पुरावे आणि खुलासे समोर येत आहेत.
Sponsored Links by Taboola