Vaishnavi Hagawane Death: कपडे फाटेपर्यंत मारहाण,मनाला लज्जा वाटणारे कृत्य; हगवणेंच्या मोठ्या सूनेसोबतही नको नको ते घडलेलं

Vaishnavi Hagawane Death: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केली. वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.

Vaishnavi Hagawane Death

1/9
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केलीय. वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेतला.
2/9
वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली. तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले, तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले. या प्रकरणात सध्या हुंडाबळी व मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
3/9
व्हिसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल, अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली. राजेंद्र हगवणे , त्यांची पत्नी आणि मुलावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय. राजेंद्र हगवणे त्यानंतर फरार झालेत.
4/9
अजित पवार गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला तसेच पती शशांक हा चारित्र्यावरून संशय ही घेत होता.
5/9
वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला. अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचा ही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला. नोव्हेंबर 2024मध्ये तिने पौड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा ही दाखल केलाय. सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली अन मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं. मात्र तेंव्हा ही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेंव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहान सून वैष्णवीवर हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती. आता एवढं होऊन ही अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेना झालेत.
6/9
राजेंद्र हगवणेंच्या मोठ्या सुनेने देखील मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात छळवणुकीची आणि बेदम मारहाणीची तक्रार दिली होती आणि त्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र पोलीसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतर मोठी सुन घर सोडून निघून गेली.
7/9
लहान सुनेचा देखील तसाच छळ सुरु होता‌. काही दिवसांपुर्वी लहान सुनेने छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र दखल घेतली नाही आणि आता लहान सुनेने आत्महत्या केली.
8/9
राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत, त्यामुळंच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाही. या चर्चेत तथ्य नाही, पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधन पोलिसांनी केलाय. मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
9/9
आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे. पैकी पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आलीये तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरु आहे.
Sponsored Links by Taboola